Saturday, March 24, 2018

Just for a change :-)

असंच कधीतरी मन उदास होतं
चिडचिड व्हायला लागते
मनासारख्या गोष्टी होत नाहीत
सगळं जग दुष्मन वाटायला लागतं
अगदी अंथरुणातून उठायचंही मन होत नाही

अशावेळी स्वतःला कसं सावरावं?
अनेक तज्ज्ञांनी अनेक उपाय सुचवले असतील
पण माझ्यापुरते मी उपाय शोधून ठेवले आहेत

सकाळी उठल्यावर रोजच्या पेस्टपेक्षा वेगळी पेस्ट ट्राय करावी किंवा चक्क दंतमंजन वापरून बघावं
रोज उजव्या हाताने ब्रश करतो, आज डाव्या हाताने ट्राय करावा.
मग टीव्हीवर म्युझिक चॅनेल्स लावावेत, त्यावरचं मस्त म्युझिक ऐकत कडक चहा घ्यावा.. जरा मनाला उभारी येते.
रोजच्या गरम पाण्याच्या आंघोळीऐवजी थंडगार शॉवर घ्यावा.. पहिल्यांदा पटकन गार पाण्याखाली जायचा धीर होत नाही. निग्रहाने त्या थंड पाण्याच्या वर्षावाखाली जावं आणि तो शहारा मेंदूत रेकॉर्ड करून ठेवावा.
नेहमी डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ घालतो, आज उजव्या हातावर ट्राय करावं
रोज घालतो त्यापेक्षा वेगळा चष्मा घालावा, डावीकडून भांग पाडतो त्याऐवजी उजवीकडून पाडावा.
क्लीन शेव्ह ऐवजी फ्रेंच कट /मिशी ठेवून बघावी

ऑफिसला जर रोज फॉर्मल ड्रेस घालून जात असेल तर आज फॉर अ चेंज एखादा ब्राईट कलरचा शर्ट किंवा टीशर्ट-जीन्स घालून जावं
बाईकवरून ऑफिसला जाताना आजूबाजूच्या गाड्या पहाव्यात.
उगीचच तुमच्या शहराच्या सोडून बाकीच्या शहरांच्या गाड्यांचे पासिंग पहावे, काऊंट वाढवत जावा. उदाहरणार्थ - नाशिक पासिंगच्या १० गाड्या, नगर पासिंगच्या १५ गाड्या, इत्यादी
ऑफिसला जायचा रोजचा रस्ता सोडून एखादा वेगळा रस्ता ट्राय करावा.
रोज ज्या सिक्वेन्सने गाणी ऐकत बाईकवरून जातो त्याऐवजी प्लेलिस्ट शफल मोडमध्ये करून बघायला काय हरकत आहे?
ऑफिसमध्ये रोज जाऊन जे काम करतो त्यापेक्षा आज काहीतरी वेगळं करावं
नेहमीच्या लोकांपेक्षा वेगळ्या लोकांशी संवाद साधावा
लंचला रोज भाजी पोळी खातो त्याऐवजी पास्ता, चायनीज ट्राय करावं

असे अनेक सुहृद, जुने मित्र/नातेवाईक असतात ज्यांच्याशी वर्षानुवर्षे बोलणं झालेलं नसतं
आज वेळात वेळ काढून त्यांना कॉल लावावा आणि मग त्यांचं आश्चर्य उरात भरून घ्यावं. त्या समाधानावर पुढचे कित्येक दिवस जाणार असतात


ऑफिसमधून आज नेहमीपेक्षा लवकर निघावं
घरी कॉल करून सांगावं की आज स्वयंपाक नका करू, आपण बाहेर जेवूया
एखाद्या नाटकाची, चित्रपटाची तिकिटे काढावीत आणि घरच्यांना सरप्राईज द्यावं

ह्या सगळ्याचा हेतू एकच की आपल्या मेंदूला जे रोजच्या रुटीनचं कंडिशनिंग झालंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं,
मेंदूला जरा शॉक द्यावा. आपले सेन्सेस पुन्हा जागृत होतायेत का ते पहावं

शेवटी अंथरुणाला पाठ टेकताना काहीतरी वेगळं केल्याचं नक्कीच समाधान लाभेल.
आयुष्य सुखकर करायला अजून काय हवं असतं?

1 comment:

Anonymous said...

सही ����
रूटीनमध्ये थोडासा बदल केला किंवा झाला तरी सगळी मरगळ निघून जाते.
तू म्हणालास ना की वर्षानुवर्ष न भेटलेल्या मित्रांशी बोलावं, त्यांचे आश्चर्य उरात भरून घ्यावं....पण तू कधी असा विचार केला आहेस का की तू ‘just for a change’ म्हणून केलेला एखादा काॅल किंवा एखादा मेसेज कदाचित समोरच्याला सुध्दा नकळत रूटीनपेक्षा काहीतरी वेगळं करायला लावेल!!!

Let me tell you something...

सकाळी नेहमीप्रमाणे फोनचा अलार्म होतो. सवयीप्रमाणे तो बंद करून WhatsApp ओपन होतं आणि खूप दिवसांनी फक्त WhatsApp friend असलेल्या एका क्लासमेटचा ‘Good morning!’ एवढाच मेसेज आलेला असतो. आणि ‘क्या बात है! आज इतक्या दिवसांनी मला मेसेज!!’ असं म्हणत एका वेगळ्याच happy feeling ने दिवस चालू होतो...

ब्रेकफास्टसाठी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी केलं जातं. आज चा दिवस वेगळा आहे, स्पेशल आहे हे सगळ्यांच्याच लक्षात येतं. आज बाहेर जाण्यासाठी तयार व्हायलासुद्धा मजा येते. एकदम bright color मध्ये ड्रेसअप होऊन बाहेर पडते. Office मध्ये गेल्यावर “Someone is happy today!!!” असं मॅनेजरने हसून म्हटल्यावर हिला कसं कळलं असा विचार करत काम सुरू होतं. एरवी खूप वेळ घेणाऱ्या गोष्टी आज एकदम पटकन होतात. लवकर काम संपूनही घरी जावंसं वाटत नाही. मग गाडीत बसून लांबवर ड्राईवला जायचं ठरतं. एरवी नको वाटणारा रस्ता आज एकदम मोकळा मिळतो. पानं नसलेली झाडं, आजूबाजूला दिसणारा depressing काळा पांढरा snow सुध्दा छान दिसायला लागतो. गाणी ऐकत घरी परत कधी पोहोचते तेही कळत नाही.

मुलगा शाळेतून घरी येतो. त्याला “How was your day? Do you have homework today?” असले फालतू प्रश्न न विचारता “Let’s play something” असं म्हटल्यावर स्वत:वरच खूष होते. संध्याकाळी जिम मध्ये नेहमीपेक्षा जास्तं वर्कआऊट करुनही दमायला होत नाही. रात्री जेवण करून, सगळं आवरून नेहमीप्रमाणे पुस्तक घेऊन बेडवर जायची वेळ होते. पण आज पुस्तक वाचायचा मूड नसतो. मग हेडफोन लावून online रेडिओ ऐकायचा मोह होतो. आणि अनपेक्षितपणे फेव्हरेट गाणे प्ले होतं....

पहेलेसे लिखा कुछभी नहीं
रोज नया कुछ लिखती है तू
जो भी लिखा है...
दिलसे जिया है..
ये लम्हा फिलहाल जी लेने दे...

ओठांवर नकळत हसू येतं. गाणं ऐकताना आजचा नेहमीपेक्षा वेगळा उगवलेला दिवस पुन्हा एकदा डोळयांसमोर तरळून जातो. गाणं संपतं. रेडिओ बंद होतो आणि सकाळच्या “ Good morning!!” च्या मेसेजला ‘Thank you!’ म्हणत मनांत एक विचार येतो..

‘I wish this day... this happy feeling never....
पण ते वाक्य पूर्ण होण्याआधीच जड झालेले डोळे मिटतात.....

And this is how you lit up someone’s day just by sending a small message for a change!