अंगाला उन्हाचे तीव्र चटके बसू लागले, वरच्या मजल्यावरच्या गॅलरीतल्या कुंड्याना घातलेलं जास्तीचं पाणी ओघळून जेव्हा अंगावर ठिबकू लागलं, आतून रेडिओचा आवाज जरा जास्तच मोठा झाला आणि बापाने "मध्या गाढवा ऊठ" असा आवाज दिल्यावर मधुसूदनने डोळे उघडले...
किलकिल्या डोळ्यांनी त्यानी रस्त्यावर एक नजर टाकली... भगभगतं ऊन, रस्त्यावरची गर्दी, लोकांची धावपळ आणि पुन्हा एकदा जाणवलेलं स्वतःचं रिकामपण डोळ्यांत साठवत त्याने डोळे गच्च मिटले... चहा ढोसायला ये अशी आईची हाक आल्यावर त्यानी त्याचे शुष्क डोळे उघडले आणि आत येऊन भिंतीला टेकला...कानतुटका कप आणि टवके उडालेल्या बशीचा दाणकन आवाज आल्यावर त्यानी समोर बघितलं... आईने नेहेमीप्रमाणे जोरात कपबशी पुढ्यात आदळल्याने अर्धाअधिक चहा बशीतच सांडला होता..
नावापुरतं दूध, अर्धा चमचा साखर असलेला तो कडू चहा त्याने दोन घोटात गिळला... "मन्याकाकाच्या कंपनीत सेक्युरिटी गार्डची पोस्ट खाली आहे.. तिकडे जाणारेस की बापाला म्हातारपणात तंगडतोड करायला लावणारेस?" असा कोपऱ्यातून आवाज आल्यावर मधू उठला आणि त्या एका रूमच्या आडोशाला केलेल्या न्हाणीघरात घुसला.. चतकोरच्याही अर्ध्या उरलेल्या साबणाला अंग घासत दोन तांब्यात त्याने आंघोळ उरकली.. कळकट झालेला शर्ट आणि पॅन्ट अंगावर चढवत मधू घराबाहेर पडला
चाळीतल्या लोकांच्या टोचणाऱ्या नजरांकडे दुर्लक्ष करत तो बस स्टॉपपाशी पोहोचला.. "हा मध्याच ना ग? बापाच्या पेन्शनवर आयतं खाणारा"? "हो तोच आहे हा".. ह्या नेहेमीच्या कुजबूजीकडे दुर्लक्ष करत तो बसची वाट पाहू लागला...212 नंबरची बस आल्यावर मधू नेहेमीप्रमाणे दाराशी जाऊन लटकला..कंडक्टर तिकिटाचे पैसे गोळे करत त्याच्या अगदी हातभर अंतरावर आला तेव्हा मधू घाईघाईत 2 स्टॉप अलीकडेच उतरला... फुकटे, चोर साले ह्या कंडक्टरच्या चिरपरिचित आवाजाकडे दुर्लक्ष करत तो झपझप पावले टाकू लागला...ठाकूरदास सांस्कृतिक हॉल ही पाटी दिसताच तो आत घुसला...
तो पोहोचला तेव्हा हॉल बऱ्यापैकी भरला होता... ओल्ड इज गोल्ड ऑर्केस्ट्रा ऑडिशन अशी गिचमीड्या अक्षरात एक पाटी स्टेजवर लावली होती.. सिंथेसाईजरवर वयस्कर अमरदा बसले होते... स्टेजवर माईक घेऊन एक पोरसवदा मुलगा "मेरे सपनों की रानी कब आयेगी तू" किंचाळत होता...
तेवढ्यात अमरदांची नजर मधूवर गेली.. सिंथेसाईझर मधेच थांबवत ते मधूकडे गेले आणि त्याला ओढत नरेशभाईंकडे गेले... "नरेशभाई, ये लडके का गाना सुनो, आप बाकी सबको भूल जाओगे" अस म्हणत त्या स्टेजवरच्या पोराकडून माईक हिसकावत त्यांनी मधूकडे दिला...
मधू माईक हातात घेत स्टेजवर चढला... अमरदांना तो कोणतं गाणं गाणारे हे पक्क ठाऊक होतं... मधूनी डोळे मिटले आणि "ओ मांझी रे" सुरु केलं.. क्षणभरात संपूर्ण हॉल चिडीचूप झाला... "साहिलों पे बेहेनेवाले"ला जेव्हा त्याने सूर लावला तेव्हा सगळ्यांच्या अंगावर काटा आला.... गाणं संपल्यावर काही क्षण भयाण शांतता पसरली आणि मग सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला
त्या कडकडाटात नकळतपणे मधुसूदन भूतकाळात गेला.. कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळी जेव्हा त्याने हेच गाणं गायलं होतं तेव्हा पहिल्या रांगेत बसलेली अवंतिका त्याच्याकडे मंत्रमुग्ध होऊन एकटक पहात राहिली... गाणं संपल्यावर तिनी स्वतःहून त्याच्याशी ओळख करून घेतली... आणि नंतर तर त्याच्या आवाजावर फिदा होत ती त्याच्या प्रेमातच पडली...
चांदण्या रात्री, नदीकाठी हातात हात गुंफून चालत असताना दोघांनी मिळून गायलेलं "ये रातें, ये मौसम नदीका किनारा" आठवलं.. "कहा दो दिलोने के, मिलकर कभी हम ना होंगे जुदा" हे एकसुरात गात अवंतिकानी त्याच्या खांद्यावर हलकेच ठेवलेलं डोकं आठवलं...कॉलेज संपल्यावर ऑडिटोरियमच्या पायऱ्यांवर बसून तिच्यासाठी गायलेलं "छुकर मेरे मनको किया तुने क्या इशारा" आठवलं.... अवंतिकाच्या नजरेतील व्याकुळता आणि तेव्हाच घेतलेल्या प्रेमाच्या आणाभाका आठवल्या...
तेवढ्यात त्याच्या पाठीवर नरेशभाईंची थाप पडली आणि तो भानावर आला... "हिरा आहे रे तू हिरा, इतके दिवस कुठे लपून बसला होतास रे? अमरदा इसको नवरात्री के लिये फायनल कर दो"....
मग बराच वेळ मधू अमरदांबरोबर गाणी सिलेक्ट करत बसला... रात्री बऱ्याच उशिरा तो घरात शिरला..
बल्बचा अपुरा पडणारा उदासवाणा प्रकाश, त्यात माणसांच्या, वस्तूंच्या पडलेल्या अनावश्यक सावल्या, स्टोव्हची भगभग ...
मधू येऊन भिंतीला टेकला... बाप तिरिमिरीत येऊन मधूचे दोन्ही खांदे पकडून जोरजोरात हलवत म्हणाला "नालायका, कुठे तडफडला होतास दिवसभर?? मन्याकाकाच्या कंपनीत का नाही गेलास? अरे बांडगुळा अजून किती दिवस जगशील बापाच्या पैशावर?" संतापाचा उद्रेक होऊन मधूचा बाप हमसून हमसून रडायला लागला.. आईनी नेहेमीसारखं बाप-लेकाकडे हतबल होऊन पाहिलं आणि डॊळ्याला पदर लावला...
बराच वेळ कुणी काहीच बोललं नाही आणि मग मधू सावकाशीने उठला आणि पेलाभर पाणी पिऊन गॅलरीत झोपायला गेला. अरे जेवण..... , आईचे शब्द अर्धवटच राहिले...
पुढचे काही दिवस मधू गाण्याच्या सरावाच्या निमित्तानी बाहेरच राहू लागला.. "इशारो, इशारोमें दिल लेनेवाले"च्या वेळी त्याच्या आवाजातल्या हरकती पाहून सीमा आश्चर्यचकित झाली... "वो शाम कुछ अजीब थी"च्या वेळचा त्याच्या आवाजातला हळुवारपणा जाणवून अख्खा ऑर्केस्ट्रा ग्रुप निःशब्द झाला..
मधू सुरांच्या साम्राज्यातला राजा होता.. डोळे बंद करून एकदा गाणं सुरु केलं कि त्याला आयुष्यातलं अपयश, बेकारी, भकास चाळ, तुटका कप, कडवट चहा, भिंतींचे पोपडे, गॅलरीतलं ते अंग मुडपून झोपणं, बल्बचा पिवळट, उदासवाणा उजेड, हतबल आई, पिचलेला बाप सगळं सगळं विसरायला व्हायचं...
असाच एकदा सराव चालू होता.. "हम खो चलें, चांद है या कोई जादूगर है" म्हणत असतानाच दरवाजा खाडकन उघडला गेला... नरेशभाई घाईघाईने आत आले आणि थेट अमरदांकडे गेले.. "अमरदा, आपला प्रोग्राम थोडा चेंज करावा लागेल... अभी ये नये लोगोंको रफी, लता, मुकेश, किशोर ज्यादा पता नहीं है... तो आधा टाईम ओल्ड इज गोल्ड और बाकीका आधा न्यू इज फन करना पडेगा... मिका, हनी सिंग ह्या लोकांची गाणी सिलेक्ट करून टाका.." अमरदांनी होकारार्थी मान डोलावली.... तो होकार नरेशभाईंच्या प्रपोजलपेक्षाही कितीतरी पटीने अधिक त्यांच्या स्वतःच्या अगतिकतेमुळे होता.. वन रूम किचनचा हप्ता, पोराला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिपायाची नोकरी लावण्यासाठी द्यावे लागणारे पैसे, बायकोचं आजारपण सगळं सगळं डोळ्यांसमोरून तरळून गेलं..ह्याच अगतिकतेमुळे त्यांनी आधीही गणपतीतल्या, नवरात्रातल्या आरत्यांना फिल्मी गाण्यांच्या चाली लावल्या होत्या..
तेवढ्यात नरेश भाई मधू कडे वळून म्हणाले, " अरे सुपरस्टार, जरा आता माझी सटकली ऐकव यार..."
हे ऐकताच मधूनी जळजळीत नजरेनी पाहिलं... नरेशभाईना त्याच्या नजरेतला अंगार जाणवला असावा, "क्या प्रॉब्लेम है रे तुझे?"
"असली गल्लाभरू गाणी गाणं शक्य नाही मला... रफी, किशोर मुकेशच्या सुरांवर पोसलोय मी... फक्त गायकच नाही तर संगीतकार, गीतकारही तेवढ्याच ताकदीचे होते.. आरडी, ओपी, एसडी, मदनमोहनसारख्या दिग्गजांच्या चाली ओठावर आहेत आणि साहिर, शैलेंद्र, मजरूह, गुलजारसारख्यांचे शब्द मनात... ही अशी थिल्लर गाणी गाणं शक्य नाही मला"
हे ऐकताच नरेशभाईंचा राग अनावर झाला आणि ते मधूला ओरडून म्हणाले "दिडदमडीचा गायक तू आणि दुसऱ्याच्या गाण्याची लायकी काढतोस?? अरे तुझ्यासारखे पन्नास गायक पडलेत बाजारात, पैसा फेकला तर वाट्टेल ते गातील माझ्यासाठी... आणि काय रे स्वतःच्या बापाच्या पेन्शनवर जगतो तू.. चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि मला शहाणपणा शिकवतोस? चल हो बाहेर, परत तोंड नको दाखवूस मला"
…..........

3 comments:
पांढरपेश्या घरातलं वातावरण, तुटपुंजी पेन्शन, त्यात खाणारी तीन तोंडं, दारिद्र्य, गुणी असूनही काळाशी किंवा व्यवहार्यतेशी जुळवून घेता न येणारा मधुसूदन...अस्वस्थ करणारं आहे हे सगळं...महान अभिनेते गुरूदत्तांचा एखादा सिनेमाच मी पहातोय असं वाटलं हा लेख वाचताना... शुभेच्छा ।।।

मस्त
Post a Comment