काल रात्री भयंकर पाऊस आणि विजा पडल्या असाव्यात..कारण सकाळी जाग आली तेव्हा मी पाण्यावर तरंगत होतो... आजूबाजूला पाच पंचवीस चांदण्या तरंगत होत्या आणि वरती छत कोसळून डायरेक्ट खड्डे पडलेलं आभाळ दिसत होतं..
मी नेम धरून एक एक चांदणी वरती फेकली आणि एकेका खड्डयात त्या व्यवस्थित जाऊन बसल्या...हे करत असताना एक चांदणी चुकून माझ्या मनगटाला घासली गेली.. आणि तेवढा भाग लख्ख गोरा झाला... ताबडतोब मी उरलेल्या चांदण्या संपूर्ण अंगाला घासून घेतल्या आणि आरशापुढे जाऊन उभा राहिलो... पाहतो तर काय, मी हृतिकपेक्षा साडे बत्तीसपट गोरा दिसत होतो.... मग मी उरलेल्या चांदण्या आकाशात फेकून दिल्या....
वरतून आवाज आला, चंद्र काय तुझा काका फेकणारे?? मी पोहत पोहत हॉल मध्ये गेलो.. पाहतो तर काय टीव्ही चालू होता आणि चंद्र त्यावर चंदा रे चंदा रे कभी तो जमीं पर आ, बैठेंगे बातें करेंगे गाणं पहात हसत बसला होता..
तेवढ्यात चांद छुपा बादलमें गाणं लागलं आणि घाईघाईत चंद्र पडद्याआड जाऊन लपला...
मी ड्राय बाल्कनीत जाऊन कपडे वाळत घालायची दोरी काढून आणली.... चंद्राला त्या दोरीनी बांधून मी त्याचा झिलबिंडा केला आणी सात आठ वेळा गोल गोल घुमवला.... शेवटी वेग आल्यावर तो आकाशाच्या दिशेनी जोरात फेकला... तो बरोबर सर्वात मोठ्या खड्डयात जाऊन फिट्ट बसला.... अयायाया असं करत चंद्र विव्हळायला लागला... पाठ मोडली रे माझी काहीतरी औषध फेक असा वरून आवाज आला.. मी लगबगीने आयोडेक्स, मूव्ह, झंडू बाम, रेली स्प्रे, टायगर बाम एकत्र करून त्याचा परत झिलबिंडा बनवला आणि चंद्राच्या दिशेनी फेकला.. अर्ध्या मिनिटाच्या आत आह से आहा तक, आयोडेक्स मलीये काम पे चलीये अशा आकाशवाण्या सुरु झाल्या... मी मनात म्हणालो चला मामांची सेटिंग लागली दिसतेय....
तेवढ्यात मला आमच्या दुसऱ्या बेडरूम मधून वाफा येताना दिसल्या.. मी जाऊन पाहिलं तर काय शनी खिडकीतून खालच्या लोकांकडे रागाने बघत होता.. मी हळूच बादलीभर पाणी आणलं आणि 2 डबल साईझ बेडशीट्सची टोकं जोडून एक भली मोठी बेडशीट तयार केली... शनी बेसावध आहे हे पाहून त्याच्यावर भसकन बादलीभर थंड पाणी ओतलं आणि पटकन ती बेडशीट त्याच्याभोवती गुंडाळून पक्की गाठ बांधली....मग मी आमचं डबल बेडचं स्टोअरेज उघडून त्यात शनीला बंद केलं...
अचानक मला बाथरूम मधून शॉवरचा आवाज आला, मी हळूच दार उघडून पाहिलं तर मंगळ मजेत शॉवरखाली आंघोळ करत होता...
तो बेसावध आहे हे हेरून मी लगेच दोन्ही बाथरुमचे शॉवर कर्टन्स एकमेकांना जोडले आणि त्यात मंगळाला बंदिस्त केलं
तेवढ्यात मला बाहेर गलका ऐकू आला, जाऊन पाहातो तर काय सगळे मीडियावाले हॉल मध्ये जमा झालेले.. त्यांनी मला सांगितलं की चंद्र आणि चांदण्यांनी एकमताने व्होटिंग केल्यामुळे माझी आंतरराष्ट्रीय गॅलिलियो आणि कोपर्निकस पुरस्कारासाठी निवड झाली आहे...
हे कमी होते म्हणून की काय मला राष्ट्रीय ज्योतिष आणि आंतरराष्ट्रीय नोबेल शांतता पुरस्कारदेखील जाहीर करण्यात आला होता

1 comment:
This is whacko to the core...
What were u "smoking" when u wrote this? :) I wantto smoke that too ;)
Loved it
Post a Comment